Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) (अंतर्गत तक्रार समिती) यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता आजीवन अध्ययन या विषयावर अर्धदिवसीय परिसंवाद दि.०२-१२-२०२२, शुक्रवार रोजी मा. श्रीमती रमा जोशी, तहसीलदार ता. आंबेगाव, जि. पुणे व मा. श्रीमती मोनिका माने, सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे यांच्या प्रमुख उपस्थिती व उद्बोधनाने पार पडला.

कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने व त्या नंतर प्रमुख पाहुण्याच्या स्वागताने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमती रमा जोशी, तहसीलदार, आंबेगाव, जि. पुणे व मा. श्रीमती मोनिका माने, सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला मा. प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे व ICC समिती उपप्रमुख, श्रीमती एच. एच. राक्षे, सहाय्यक प्राध्यापक, गणित यांनी सर्वांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी “आजीवन अध्ययनाचे आजच्या युगातील महत्व व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांच्या नियमित आयोजनाचे महत्व विषद केले व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी सदर कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले”.

मा. श्रीमती रमा जोशी यांनी आजीवन अध्ययन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, “सर्वांनी प्रत्येक विषयाचे उत्तम ज्ञान संपादन केले पाहिजे. गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून सदुपयोग केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रानुसार सामाजिक कार्यात मदत करून अनुभवातून शिकले पाहिजे आणि निरंतर शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. निसर्ग व निसर्गातील विविध प्राणी आपल्याला विविध चांगल्या गोष्टी शिकवतात त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. शिकलेली कोणतीही चांगली गोष्ट वाया जात नाही आपल्या जीवनाच्या वाटचालीत ती आपल्या कधी न कधी कामी येतच असते. तरुण वयातच विद्यार्थ्यांनी चांगल्या अध्यात्मिक साहित्याचे वाचन केले पाहिजे. कृष्णासारखा चांगला गुरु कोणी नाही त्यामुळे भगवद्गीता व त्यावरील निरुपण असलेली ज्ञानेश्वरी सर्वांनी आवश्य वाचावी. या सर्व वाचनातून व निरंतर अध्ययनातून विद्यार्थ्यांनी कर्मयोगी बनले पाहिजे व समाजातील गरजू घटकांची मदत केली पाहिजे”.

या नंतर मा. श्रीमती मोनिका माने, सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी यांनी पण आजीवन अध्ययन हा विषय आपल्या पद्धतीने मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक कौशल्य आत्मसात करायला सांगितले त्या म्हण्याला कि, फक्त अभ्यास नाही तर इतर हि सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रगती केली पाहिजे. कार्यक्रमात भाग घेतलेले सर्व विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. ICC अंतर्गत मेनेजमेंट टिम मधे समृद्धी कोतवाल, लीना नहीरे, प्रियंका मेटकर, अंशिता पाटील, अपूर्वा पाटील यांनी काम पाहिले. अनघा थुबे, राणी चौधरी यांनी सूत्र संचालन अनघा थुबे हिने आभार प्रदर्शन केले.

सदर अर्धदिवसीय परिसंवादाकरिता अंतर्गत तक्रार समिती प्रमुख डॉ. वंदना इनामदार व प्रा. श्रीमती एच. एच. राक्षे यांनी समन्वयक, प्रा. श्रीमती ए. व्ही. कुलकर्णी यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले.

सदर परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील अधिकारी प्रा. मंगेश पांचाळ, प्रा. श्रीमती प्राजक्ता पिंपळकर, प्रा. धीरज लेंगरे, प्रा. विशाल जाधव, प्रा. श्रीमती डी. बी. माहेश्वरी, डॉ. संदीप थोरात तसेच सहाय्यक कर्मचारी श्रीमती आर. के. डवणे, श्रीमती एस. एस. जावरे, श्रीमती पी. जे. मोरे, श्रीमती ए. डी. भट, श्रीमती एस. एन. गुट्टे, श्री. पी. व्ही. दरंदले, श्री. ए. एस. राठोड, श्री. एस. डी. वणवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.